‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Vice Chancellor in State rss thinking aashish deshmukh