मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

  • खाद्यतेल आणि दुधाच्या दरात वाढ होत असल्याने मध्यमवर्गीयींच्या खिशाला आता झळ बसणार आहे.

मुंबई: कांद्याने रडवल्यानंतर आता मध्यमवर्गीयांना जोरदार फटका बसणार आहे. खाद्यतेल आणि दुधाच्या दरात वाढ होत असल्याने मध्यमवर्गीयींच्या खिशाला आता झळ बसणार आहे. केंद्र सरकारने पामोलीन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. याचा मोठा फटका देशांतर्गत तेलाला बसला आहे. परिणामी सर्व प्रकारचे खाद्यतेल शंभरीपार गेले आहेत. तर दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ होणार असल्याने त्याचाही भार मध्यमवर्गीयांच्या बजेडवर पडणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने पामोलीन तेलाच्या आयतीवर बंदी घातलेली असताना सोयाबीनचे उत्पादनदेखील चिंतेचा विषय बनला आहे. यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन १८ ते २० टक्के घटल्याने सोयाबीन तेलाचे उत्पादही घटले आहे. त्यातच. पामोलीन तेलावर बंदी घातल्याने सोयाबीन तेलाची मागणी वाढू लागली आहेस, परिणामी दरही वाढू लागले आहेत. यावर्षी देशात तेलबियांचे उत्पादनही सरासरीपेक्षाही कमी झाले आहे. यामुळे तेलाचे दर वाढणार हे निश्चित असताना सरकारने पामोलीनवर आयातबंदी आणणे अयोग्य असल्याचे तेल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

तत्पूर्वी, गायीचे दूध 2 रुपयांनी महागलं असून प्रतिलीटरचा दूधाचा दर 44 रुपयांवर पोहोचला आहे. पुण्यात झालेल्या खासगी आणि सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयचा फटाकाही मध्यमवर्गीयांना बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात होणारी वाढ आणि दूधदरात झालेली प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडणार असल्याचे स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after onions edible oil and milk may be a tension for middle class people

Tags
टॉपिकस
Topic Tags: