सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

Sushama Andhare: अशोक खरात काळी जादू करायचा त्यासाठी बोट कापून अघोरी विधी केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी चाकणकर आणि तटकरे यांच्यावर केलाय. दोघांनी दिलेलं कारण एकच असल्यानं त्यांच्यावर टीकाही होत आहे.
Ashok Kharat Case

Opposition Targets Chakankar and Tatkare Over Identical Injury Explanation

Esakal

Updated on

Ashok Kharat Case: भोंदूबाब अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होते आहेत. अशोक खरात काळी जादू करत असल्याचेही आरोप होत आहेत. अनेक बड्या राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी हाताचं बोट कापून घेतल्याचा आरोप होत होता. यावर दोन्ही नेत्यांनी एकच कारण सांगितल्यानं भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा अजब योगायोग असल्याचं म्हणत बाबाच्या सानिध्यात राहिल्यानं दोघांनाही योगायोगाने एकाच वेळी असं होत असेल अशा शब्दात टीका केलीय. चाकणकर आणि तटकरे यांनी दिलेला खुलासा सध्या तरी सामान्य माणसाला पटणारा नसल्याचं त्या म्हणाल्यात. Opposition Targets Chakankar and Tatkare Over Identical Injury Explanation

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com