
रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा कमीच राहील. मात्र सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेट्या दाखल होत असल्याने पाच डझनांच्या पेटीचा दर ३ हजार रुपयांपर्यंत आहे. हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र डागी मालाला कवडीमोलाच दर मिळत असल्याने अनेक आंबा बागायतदारांनी आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात कॅनिंगसाठीचा आंबा ४० रुपये किलोने दराने खरेदी केला जात आहे.