"समाजकल्याण'चा आडमुठेपणा... परीक्षाच झाली नाही, तरीही परदेशी शिष्यवृत्तीसाठी 14 ऑगस्टपर्यंत दिली मुदत ! 

Scholarship
Scholarship
Updated on

सोलापूर : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द केल्या. मात्र, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येतील, असे स्पष्ट केल्याने परीक्षेचा पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाअंतर्गत समाज कल्याण आयुक्‍तालयाने परदेशात शिक्षणासाठी जे विद्यार्थी विद्यापीठाच्या रॅंकिंगमध्ये आले आहेत, त्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. कोरोनामुळे काही राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय रद्द केला आहे. तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र पाठवून राज्याच्या स्थितीची माहिती दिली. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे कसे योग्य नाही, अशी बाजू मांडली. याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित असतानाच समाज कल्याण आयुक्‍तालयाने असे आदेश काढून आडमुठेपणा चव्हाट्यावर आणला आहे. 

ठळक बाबी... 

  • अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी परदेशात शिक्षणासाठी दरवर्षी 75 विद्यार्थ्यांची केली जाते निवड 
  • एमबीए, एमडी, एएस या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नसतानाही अर्जासाठी दिली 14 ऑगस्टची मुदत 
  • अमेरिकेसह अन्य देशांत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता म्हणून 15 हजार 400 यूएस डॉलर तर यूकेसाठी 900 जीबी पौंड 
  • परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परतण्यासाठी विमान प्रवासाचा खर्चही दिला जाईल 
  • आकस्मिक खर्चासाठी यूएसए व अन्य देशांत गेलेल्या विद्यार्थ्यांना 1500 यूएस डॉलर तर यूकेसाठी 1100 जीबी पौंड मिळणार 

घाईगडबडीत काढलेल्या आदेशाचे शुद्धिपत्रक 
समाजकल्याण कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यालय क्‍वारंटाईन करण्यात आले. तत्पूर्वी परदेशातील शिष्यवृत्तीसाठी काढलेल्या आदेशात चूक झाली असून आता त्याचे शुद्धिपत्रक काढावे लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 35 वयोमर्यादा असताना 40 झाली असून पीएचडीसाठी 35 वयोमर्यादा आहे. मात्र, आदेशानुसार 40 वयोमर्यादा झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com