Ambadas Danve : ''वाचाळवीरांच्या यादीत आणखी एक नाव...'' दानवेंनी घेतला गावितांचा समाचार

ambadas danve
ambadas danveesakal

मुंबईः मासे खाल्ल्यामुळे मुली पटतात, अशा आशयाचं विधान भाजप नेते तथा मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. धुळ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गावितांचा खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले विजयकुमार गावित?

विजयकुमार गावित हे आपल्या भाषणात म्हणाले की, ऐश्वर्या रायला बघितलं का? नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले. ती समुद्र किनारी राहणारी आहे. त्यामळे ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना कसे झाले? मासे खाल्ले तर तुमचेही डोळे तसेच होणार.

गावित पुढे म्हणाले की, मासे खाण्याचा आणखी एक फायदा आहे. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते. कुणीही बघितलं तर लगेच पटणार, असं गावितांनी म्हटलं.

ambadas danve
Chandrayaan-3 Photos : लँडिंगसाठी चांद्रयान चंद्रावर शोधतंय जागा; 'इस्रो'ने केले फोटो शेअर

अंबादास दानवेंकडून समाचार

वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे.

ambadas danve
Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडीलांचे निधन, अभिनेत्याच्या परिवारावर शोककळा

भक्त आणि उठसूठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपच्या प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर (सोयीस्कर) भूमिका घेणाऱ्या मंडळींचे कान मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात. असं ट्वीट अंबादास दानवेंनी केलं आहे. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट टॅग केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com