Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेब अवकाशातील एका तारा; 'या' दिवशी मोबाइलवरून पाहा तारा

१३२ व्या जयंतीपर्वावर शुक्रवारी रात्री मोबाइलवरून पाहा तारा
Ambedkar Jayanti 2023 registry of stars in space named dr babasaheb ambedkar maharashtra
Ambedkar Jayanti 2023 registry of stars in space named dr babasaheb ambedkar maharashtrae sakal
Updated on

नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अवकाशातील एका ताऱ्याची नोंदणी (रजिस्ट्री)१३२ व्या जयंतीपर्वावर शुक्रवारी रात्री मोबाइलवरून अँड्रॉइड व अॅपल युजर्स हा तारा अॅप डाऊनलोड करून पाहू शकतात.

बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी ‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..!’ ही घोषणा दिली होती. याला आता ६७ वर्षे पूर्ण झाली. या घोषणेला मूर्त रूप देण्याची किमया करण्यात आली.

बाबासाहेबांचे अनुयायी राजू शिंदे यांनी अवकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीदिनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ताऱ्याचे लाँचिंग होईल. अँड्रॉइड व अॅपल युजर्स हा तारा अॅप डाऊनलोड करून पाहू शकतात.

Ambedkar Jayanti 2023 registry of stars in space named dr babasaheb ambedkar maharashtra
Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीएमपी मार्गात बदल

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावे दिली जातात. फ्रान्समध्येही अशीच एक संस्था आहे. शंभर डॉलर म्हणजेच भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरून एक ताऱ्याची रजिस्ट्री केली जाते.

त्या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद व्हावी म्हणून ९ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज केला होता. महिनाभराने शिंदे यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. https://space-registry.org या स्पेस रजिस्ट्री अॅपच्या संकेतस्थळावरून हा तारा मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. त्याशिवाय अँड्रॉइड, किंबहुना आयफोनवरूनही आपण हा तारा पाहू शकतो.

असा पाहता येईल

तारा द इनाेव्होटिव्ह युनिव्हर्स स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन अॅप फॉर अँड्रॉइड अँड आयओेएसवरूनही हा तारा पाहता येईल. तसेच प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अॅप डाऊनलोड करून घेता येईल. अॅपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा CX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिसू शकेल.

कुणीही ‘स्टार नेमिंग’ संस्थेशी संपर्क करून आमच्या नातेवाइकांचे नाव ताऱ्याला द्या, असे नसते. त्यासाठी विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असावे लागते. आम्ही दीड महिन्यापासून प्रक्रिया करत होतो. त्याला आता कुठे यश आले आहे.

- राजू शिंदे, अध्यक्ष, सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महासमिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com