Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

NUC FDC Headquarters to Be Set Up in Maharashtra: अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रात स्थापन करण्याची घोषणा केली. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.
Amit Shah

Amit Shah

esakal

Updated on

मुंबई: देशातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी (अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक) मध्यवर्ती संस्था म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे (एनयूसीएफडीसी) मुख्यालय आता दिल्लीऐवजी महाराष्ट्रात स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक म्हणजेच ४४९ नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत असल्याने, या शिखर संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com