esakal | '...चंंद्रकांतदादांनी दरवाजे उघडले तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणच राहतील'
sakal

बोलून बातमी शोधा

'...चंंद्रकांतदादांनी दरवाजे उघडले तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणच राहतील'

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे दरवाजे उघडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते राहतील, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

'...चंंद्रकांतदादांनी दरवाजे उघडले तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणच राहतील'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे दरवाजे उघडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते राहतील, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापुरात झाला. या यात्रेला अमित शहा उपस्थित होते. आज दुपारपासूनच सोलापुरात सरदार अमितभाई शहा असे पोस्टर्स लागले होते. सभेत अमित शहा यांचा सरदार म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांकडून दोनवेळा उल्लेख करण्यात आला.

अमित शहा म्हणाले, की भाजपमध्ये विरोधी पक्षातील अनेक नेते प्रवेश करत आहेत. चंद्रकांतदादांनी दरवाजे उघडले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणच त्यांच्याकडे उरतील. शरद पवार कित्येक वर्ष तुम्ही सत्तेत होतात. तुम्ही कधी हिशोब देणार. शरद पवार यांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी आणि राज्याच्या १५ वर्षांचा हिशेब द्यावा. एक रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोप आमच्यावर नाही, देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी काम केले.

loading image
go to top