

Amit Shah Meets Fadnavis and Shinde
Esakal
मुंबई, ता. ८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात बंद दाराआडच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने उलटसुलट चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वीच रणनीतीकार प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.