
Amit Shah : मुख्यमंत्री पदासाठी 'त्यांनी' विरोधी पक्षांचे तळवे चाटले; अमित शाह ठाकरेंवर बरसले
पुणेः विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. रात्री 'मोदी @20' पुस्तकाच्या निमित्तने अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यावर बोलतांना अमित शाह म्हणाले की, निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंगण्यचा आपल्याला निर्धार करायचा आहे.
मोदी @20 पुस्तकाबद्दल अमित शाह म्हणाले...
मोदीजींच्या पुस्तकाचे अनुवाद ही एक मोठी प्रक्रिया आहे
लोकांना मी अपिल करतो की देशाची लोकशाही कशी यशस्वी झाली, हे पाहायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा
या देशात ७५ वर्षात २२ सरकारं बनले आणि १५ पंतप्रधान झाले
'मोदी @२०' हे मोदीजींच्या जीवनावर आधारित नसून, भाजपची यशोगाथाही नाही. पण हे पुस्तक भारतातील समस्यांचे निराकरण आहे
एक व्यक्ती सगळ्या गोष्टी त्यागून पक्षासाठी आपले सर्वस्व देतो तसेच गरिबांचे समस्या शोधतो आणि त्याचे निरसन करतो, ही मोठी गोष्ट आहे
मोदी हे कधी ही सरपंचपदासाठी लढले नाहीत पण कामाच्या जोरावर त्यांना मुख्यमंत्री पदासाठी लढायला पक्षाने संधी दिली
गुजरातमध्ये मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो- शाह
मोदीजी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले तेव्हा मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो
सर्वस्पर्शी विकास कसा होतो, हे त्यांनी शिकवलं
गुजरातमध्ये पहिल्यांदा अर्बन डेव्हलपमेंट आणि दहशतवाद विरोधात काम सुरु झाले
यूपीए सरकारमध्ये आतंकवादी आपल्या देशात येऊन आपले शिरछेदून गेले
तेव्हाचे पंतप्रधान बाहेरच्या देशात जाऊन लिहलेले भाषण वाचायचे
थायलंडचे भाषण सिंगापूरमध्ये वाचायचे आणि सिंगापूरचे भाषण थायलंड मध्ये वाचायचे
त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी तळवे चाटले- अमित शाह
काल एक निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले. मागच्या वेळी आम्ही निवडणूक एकत्र लढली पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले, असा घणाघात अमित शाह यांनी ठाकरेंवर केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून लढेल, जे धोका देतात त्यांना कधी क्षमा केली नाही पाहिजे, असं अपिल मी कार्यकर्त्यांना करायला आलो आहे, असं अमित शाह म्हणाले.
आम्ही विचारांशी बांधील आहोत, सत्ता मिळवण्यासाठी वडिलांचे विचार सोडणारे नाहीत, असा टोला शाहांनी उद्धव ठाकरेंना लगावला.