
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील नांदेड येथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर, सर्वजण सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानचे खोटेपणा उघड करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ अनेक देशांमध्ये पाठवण्यात आले आहे, असं अमित शाह म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली आहे. त्यांच्यावरून एक वक्तव्य केले आहे.