देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)
देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) esakal

Amit Shah : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी थेट अमित शाह येणार; असा असेल दौरा

Published on

पुणेः कसबा पेठ निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याची माहिती आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी अमित शाह पुण्यात येणार आहेत.

आधी कसब्याची जागा कोण लढणार यावरुन गोंधळ सुरु होता. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना ‘कसब्या’तून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा असतानाच शैलेश टिळक यांनाच भाजपा नेत्तृवाने उमेदवारी नाकारली. त्याठिकाणी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.

कसबा मतदारसंघात काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने टिळक कुटुंबाला डावलल्यामुळे पक्षाला फटका बसू नये म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक परिवाराशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे (Nana kate) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल, अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध केली नाही.

भाजप निवडणुकांना किती गांभीर्याने घेतं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या प्रचारासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येत आहेत. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुण्यात असतील. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

१८ फेब्रुवारी रोजी 'मोदी @20' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. तर १९ तारखेला स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसृष्टीच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. कसबा निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. पोटनिवडणूक प्रचार आणि शिवजयंतीचं निमित्त असा संगम भाजपने साधल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.