MHADA परीक्षेप्रकरणी तिघांना अटक; अमिताभ गुप्तांचा मोठा खुलासा

Amitabh Gupta
Amitabh GuptaGoogle

मुंबई: राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचं पुन्हा एकदा दर्शन घडलं आहे. आरोग्य भरती घोटाळा, पेपरफुटीच्या प्रकरणांनी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हैराण असतानाच आता याचप्रकारचं आणखी एक ढिसाळ कारभाराचं उदाहरण समोर आलं आहे. राज्यातील म्हाडाच्या परीक्षा (MHADA Exam Cancelled) ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दोन वाजता केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त असणारे विद्यार्थी आणखीनच क्रोधित झाले आहेत. मात्र, हा पेपर फुटला जाणार असल्यानं ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. हा पेपर कशापद्धतीने फुटला जाणार होता आणि कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली आहे, या संपूर्ण प्रकाराबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत खुलासा केला आहे.

Amitabh Gupta
नोकरी देत नाही, पण थट्टा तरी नका करू; फडणवीसांचा सरकारवर निशाणा

अमिताभ गुप्ता यांनी म्हटलंय की, आज म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. ज्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रीतेश देशमुख व दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. औरंगाबादलाही एक अटक करण्यात आलीये. याप्रकरणी म्हाडाकडून फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला असून याच्यामागे कोण मोठा सूत्रधार आहे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

या गैरकारभारावरून आता राज्यात महाविकास आघाडी सरकारवर (Maha vikas Aghadi) टीका केली जातेय. याबाबत टीका करताना प्रवीण दरेकर यांनी हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याची जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही असा सवाल विचारला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर अशी थट्टा तरी करू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Amitabh Gupta
रोहीत पवार म्हणाले, "परीक्षा पुढे ढकलली जाणं दुर्दैवी पण,..."

काय आहे प्रकरण?

म्हाडाकडून (MHADA) आयोजित करण्यात आलेली परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ५६५ जागांसाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती. रविवारी (ता.12) सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार या पदांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा होणार होती. या दोन्ही परीक्षेला एक लाख 6 हजार उमेदवार बसणार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com