पंचवीस हजार कोटींच्या कथित घोटाळ्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही का?
chandrakant patil sanjay raut
chandrakant patil sanjay raute sakal

कोल्हापूर: भाजप सरकारच्या काळात 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा करून आरोपी अमोल काळे (Amol Kale) यांना देशाबाहेर पळवून लावले असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) केला होता. याला प्रत्यूत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या मागे मी आणि पक्ष खंबीरपणे उभे आहे. हम करे सो कायदा प्रमाणे मनमानी चालणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमोल काळे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, मला कोण अमोल काळे माहित नाही. त्याच्यावर काय आरोप आहेत हे मला माहित नाही. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा संजय राऊत किंवा शरद पवार यांच्या बांधाला बांध नाही. किरीट सोमय्या हे आमचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Summary

मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा संजय राऊत किंवा शरद पवार यांच्या बांधाला बांध नाही.

chandrakant patil sanjay raut
Sanjay Raut: संजय राऊत शिवसेना संपवत आहेत, चंद्रकांत पाटलांचा आरोप

संजय राऊतांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(Uddhav Thackeray) रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदमान करून उद्धवजींना त्यांची खुर्ची खाली करण्यास भाग पडायचे आहे असं दिसतंय. विरोधकांना उसकवून संजय राऊत यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे की काय? असा खोचक टोला त्यानी लगावला.

गळ्याशी आल्यानंतर प्रकरण बाहेर काढतात

पाटील म्हणाले, गळ्याशी आल्यानंतर प्रकरण बाहेर काढतात.27 महिने यांचे सरकार आहे, इतके वर्षे काय झोपा काढत होता काय? सरकारकडे तक्रार करावी, 27 महिने या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का? तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सगळं तुम्हाला आठवलं का? तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसं होईल.

राजकारणात टीका करताना काय-काय शब्द काढतात?

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत, हे सगळे भांबावून गेलेत. पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही. राजकारणात टीका करताना काय-काय शब्द काढतात? धमक्या काय देतात, अनिल देशमुख आतमध्ये आहेत तर सगळ्यांनी हात काढून घेतले. ही आमची संस्कृती नाही असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com