
दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर; अमोल कोल्हेंची टीका
'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून राजकीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला. अनेकांनी टीका-टीपण्णी केली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटामध्ये काश्मीर (Bollywood Movies) पंडितांवर काश्मीरच्या खोऱ्यात झालेले अन्याय, अत्याचार (kashmiri pandits) त्यांचे विस्थापन या मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आतापर्यत मोठ्या प्रमाणावर या चित्रपटावर टीकाही झाली आहे. दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे. आज पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
हेही वाचा: राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग
काश्मीर फाईल्सवर टीका करताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, चित्रपटातील कलाकृती विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्याच चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज आहे. मात्र काही प्रमाणात एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते की काय अशी शंका उपस्थित होतेय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: क्रियापदाला ED लागलं की त्याचा काळ बदलतो- चित्रा वाघ
एक नरेटिव्ह सेट केला जातोयं अशी शंका उपस्थित होत असल्याचे कोल्हे म्हणाले. पुढे ते म्हणाले, त्याची दुसरी बाजू अशी आहे की, जो नरेटीव्ह सेट केला जातोय त्याच्यापलीकडे जाऊन एक सर्वसमावेशक विचार येण्यासाठी सुध्दा त्याच माध्यमाचा तितक्याच प्रभावी पध्दतीने वापर करतो येतो असेही ते म्हणाले.
Web Title: Amol Kolhe Comment On The Kashmir Files Movie Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..