Chitra Wagh l क्रियापदाला ED लागलं की त्याचा काळ बदलतो; चित्रा वाघ यांच्याकडून राऊतांचा समाचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra-Wagh-Sanjay-Raut

गृहखात्यावरचं आक्रमण असल्याचा जावईशोध राऊतांनी लावला असा टोला त्यांनी हाणला आहे.

क्रियापदाला ED लागलं की त्याचा काळ बदलतो- चित्रा वाघ

ईडीचा (ED) तपास हा राज्याच्या गृहखात्यावरचं आक्रमण असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या कारवाईवरून आज ते आक्रमक झाले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत घेतला आहे. गृहखात्यावरचं आक्रमण असल्याचा जावईशोध राऊतांनी लावला असा टोला त्यांनी हाणला आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रेमळ सल्ला; म्हणाले...

राऊत यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, ईडी अनेक वर्षांपासून सबंध देशातल्या फक्त आर्थिक गुन्ह्यांचा तपास करत असताना ते एखाद्या राज्याच्या गृहखात्यावर कसे काय आक्रमण ठरते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या,एखाद्या क्रियापदाला ED लागलं की त्याचा काळ बदलतो म्हणतात ते खोटं नाही. ED चा तपास हा राज्याच्या गृहखात्यावरचं आक्रमण असल्याचा सर्वज्ञानी यांचा जावईशोध असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग

काय म्हणाले संजय राऊत

आता ईडीला फक्त पाकिटमारीचा तपास करणं बाकी आहे. पण, राज्याचं गृहखातं अधिक बळकट करण्याची गरज आहे. पोलिस यंत्रणा ज्यांच्या अधिकाराखाली येतेय, त्यांनी लक्ष द्यावं, असा सल्ला देखील संजय राऊतांनी दिला. नाना पटोलेंचे वकील सतीशे उकेंवरील ईडी कारवाईनंतर (ED Raid on Nana Patole Lawyer) संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Sanjay Raut Ed Ed Action Suggest React Chitra Wagh Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top