कंगणाचा बोलविता धनी कोण हे सर्वांनाच माहिती : अमोल कोल्हे

सागर दिलीपराव शेलार
Thursday, 10 September 2020

राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना कंगणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला अप्रत्यरित्या चांगलेच फटकारले.

पुणे : राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना कंगणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला अप्रत्यरित्या चांगलेच फटकारले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार कोल्हे म्हणाले, ''एखाद्या व्यक्तीला किती महत्व द्यायचे हे ठरवायला हवे. कंगणाचा बोलविता धनी कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आहे. कंगणापेक्षा देशात  अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, त्यांना महत्व द्यायला हवे. तिच्या मुद्द्यांना अवास्तव महत्व नको. आपल्याला ज्या महाराष्ट्राने मोठे केले त्याची आपण जाणीव ठेवायला हवी.''

कोल्हे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील व मुंबई पोलिसांमुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. गेल्या चार ते पाच महिण्यांपासून ते अहोरात्र रस्त्यावर कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यांच्याबद्दल वाईट बोलणे योग्य नाही. कंगणाच्या या गोष्टींचे कोणताही बुद्धीजीवी समर्थन करणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात बेरोजगारी रोज वाढते आहे. रोज देशात लाखाच्या जवळपास कोरोना रूग्ण सापडत आहेत. देशाची आर्थिक स्थिती खुपच वाईट झाली आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. उद्योग-व्यवसाय अडचणीत आहेत, अशा  मुद्द्यावर देशातील नेतृत्व बोलायला तयार नाही. असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Kolhe criticizes Modi government