'ED' Mubarak : '...नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल'; MP Amol Kolhe असं का म्हणाले?

त्यांच्या पोस्टचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Amol Kolhe
Amol KolheSakal

रमजानचा पवित्र महिना आता संपला असून आज देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेले रोजेही आता संपले आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेते देखील रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे.

अमोल केल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं.. "I" लई Important... नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E"i"d Mubarak!" अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Amol Kolhe
संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
Amol Kolhe
Amol KolheSakal

सध्या केंद्र सरकारकडून आणि भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप अनेकदे केला जातो. भाजप सोडून इतर पक्षात असलेल्या नेत्यांना EDची भिती दाखवली जाते असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतील नेत्यांकडून होतो. त्यानंतर आता EID ऐवजी ED लिहून सरकारवर अप्रत्यक्ष टीका केल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, आज रमजान ईद सोबतच हिंदू बांधवांचा अक्षय्य तृतीया हा सणसुद्धा आहे. दोन सण सोबत आल्यामुळे सध्या मुस्लीम आणि हिंदू बांधवामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com