कोल्हापूरच्या 'वडापाव'वर अमोल कोल्हेंनी मारला ताव अन् झाले भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Amol Kolhe

कोल्हापूरच्या 'वडापाव'वर अमोल कोल्हेंनी मारला ताव अन् झाले भावूक...

कोल्हापूर : जगात भारी कोल्हापूरी म्हणतात ते उगाच नाही. इथली खाद्य संस्कृती, पर्यटन, हवामान याच्या प्रेमात प्रत्येकजण पडतोच. इथला तांबडा- पांढर रस्सा, मटणााचं लोणचं, किंवा मिसळ एकदा खाल्लं की त्याच्या प्रेमात खाद्यप्रेमी पडल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरचा मोह सहसा सुटत नाही असं बोलल जातं. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ( Dr.Amol Kolhe)देखील कोल्हापूरच्या (Kolhapur Food) खाद्य संस्कृतीच्या प्रेमात पडलेत. त्यांनी सोशल मिडियावर कोल्हपूरच्या प्रसिद्ध झाडाखालच्या वड्याविषयी पोस्ट लिहली आहे. यात त्यांनी फोटो पोस्ट करत कोल्हापूरची आठवण सांगितली आहे. पुन्हा एकदा कोल्हापूरच्या वास्तव्यातील आठवणी जाग्या झाल्या..! अशी भावना व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये कोल्हे म्हणाले, कोल्हापूरकरांसाठी परिचित असणारं नाव 'झाडाखालचा वडापाव.'‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’च्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने कोल्हापूरला जाणं झालं आणि २०१५ सालच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. याच ठिकाणी खरंतर जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीची सुरवात झाली होती.

हेही वाचा: वजन कंट्रोलसह आॅक्सीजन लेवल वाढवते डाळिंब: जाणून घ्या फायदे

शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्तानं २०१५ मध्ये कोल्हापुरात गेलो होतो. त्यावेळी 'झाडाखालचा वडापाव' ला जाऊन कट वडा खायचा..! हा रोज सकाळचा नित्यक्रम होता. वडापाव' ला जाऊन कट वडा खायचा..! आता झाडाखालचा वडापावचं बदललेलं रूप पाहिलं आणि आनंदाची, कौतुकाची गोष्ट अशी आहे की चव आणि क्वालिटी तशीच आहे. आणि जी व्यावसायिक भरारी याचे मालक शौकत मुकादम यांनी घेतली आहे, ती अभिनंदनीय आहे.पुन्हा एकदा झाडाखालच्या वडापावची चव चाखताना शौकत मुकादम यांचं यश हे डोळ्यासमोर दिसत होतं.आणि या कष्टाचं आणि मेहनतीचं कौतुक करावंसं वाटलं.पुन्हा एकदा कोल्हापूरच्या वास्तव्यातील आठवणी जाग्या झाल्या..!

loading image
go to top