हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन राष्ट्रवादीने पाळला शब्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amol Mitkari and makrand patil are candidate fof MLC From NCP

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तरुण नेते अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीने हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देत शब्द पाळला असल्याची भावना निर्माण झाली आहे.

हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन राष्ट्रवादीने पाळला शब्द

पुणे : आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तरुण नेते अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीने हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देत शब्द पाळला असल्याची भावना निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावं अनेक दिवसांपासून चर्चेत होते. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते. तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं आहे. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे.

दिल्ली पुन्हा हादरली; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करून दोघांचेही अभिनंदन केले आहे. शशिकांत शिंदे, सातारा व अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे. अशा प्रकारचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान,  विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. आतापर्यंत शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काँग्रेसनेही 2 उमेदवार जाहीर केले आहेत.

Web Title: Amol Mitkari And Shashikant Shinde Are Candidate Fof Mlc Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..