CM शिंदे-शरद पवारांच्या भेटीत बरंच काहीतरी दडलंय; अमोल मिटकरींचं सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

CM शिंदे-शरद पवारांच्या भेटीत बरंच काहीतरी दडलंय; अमोल मिटकरींचं सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटणार असा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे. शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यानंतर या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केल्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट यात बरंच काही दडलंय, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं. त्यानंतर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र येईल का, अशी चर्चा मिटकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्याच्या राजकारण खळबळ माजवणारे हे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट युतीचे संकेत दिले आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा: शरद पवारांच्या भेटीसंदर्भात एकनाथ शिंदेंचा खुलासा; म्हणाले...

शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात गेले होते. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. या भेटीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : रुग्णालयात जावून शरद पवारांची भेट घेतल्यानंतर CM शिंदे म्हणाले...