ED Action : केंद्र, राज्य सरकारने ईडीचा आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला

Amol Mitkari Latest Marathi news
Amol Mitkari Latest Marathi newsAmol Mitkari Latest Marathi news

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर रविवारी (ता. ३१) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली. सात तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी केली जात आहे. या कारवाईचा विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध केला जात आहे. आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कारवाईवर भाष्य केले आहे. (Amol Mitkari Latest Marathi news)

‘महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये रविवारी सुद्धा सुरू ठेवावीत. केंद्र व राज्य सरकारने ईडीचा (ED) आदर्श घ्यावा’ असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅगही केले आहेत. मिटकरी (Amol Mitkari) हे भाजपविरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही, हे विशेष...

‘संजय राऊत यांच्या घरावर ईडीने (ED Action) धाड टाकल्याने शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपने ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत’ अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी याआधी दिली. यानंतर त्यांचे ट्विट आले.

भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. ईडी, सीबीआय आदींचा गैरवापर केला जात आहे. ईडीचा धाक दाखवून पक्षांतर केले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावरही ईडीची कारवाई करण्यात आली. दोघेही सद्या तुरुंगात आहेत.

Amol Mitkari Latest Marathi news
इराणींनीही केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान; चौधरींचा पलटवार

तसेच अनिल परब यांच्यावर सुद्धा ईडीने कारवाई केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची सुद्धा ईडीने चौकशी केली आहे. यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात आले होते. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला सुद्धा विरोध केला जाते आहे, हे विशेष...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com