
इराणींनीही केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान; चौधरींचा पलटवार
नवी दिल्ली : भाजप खासदार स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी ज्याप्रकारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव घेतले त्यामुळे त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. इराणी या सभागृहाला संबोधित करताना द्रौपती मुर्मू यांचे नाव ओरडून घेत होत्या. यामुळे राष्ट्रपतींचा अपमान झाला, असे लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी सभापती ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी सभागृहात केलेले वक्तव्य काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
मी हे देखील निदर्शनास आणू इच्छितो की स्मृती इराणी ज्या प्रकारे राष्ट्रपतींचे नाव सभागृहात घेत होत्या ते योग्य नव्हते. ते आदरणीय राष्ट्रपतीपदाच्या अनुरूप नव्हते. मॅडम किंवा श्रीमती हा शब्द न वापरता द्रौपदी मुर्मू (Adhir Ranjan Chowdhury) असे म्हणून ओरडत होत्या, असेही काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लिहिले आहे.
हेही वाचा: Rashtrapatni Remark : सोनिया गांधींच्या प्रश्नाला रमा देवींचे उत्तर; तुमची...
हे स्पष्टपणे माननीय राष्ट्रपतींच्या पदाचे अपमान करण्यासारखे आहे. स्मृती इराणी (Smriti Irani) ज्या पद्धतीने माननीय राष्ट्रपतींना संबोधित करीत होत्या त्यांना सभागृहाच्या कामकाजातून बाहेर काढले जावे. सोनिया गांधी यांचा या वादाशी काहीही संबंध नाही. त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला संपूर्ण भाग सभागृहाच्या कामकाजातून बाहेर काढला जाऊ शकतो, असेही अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) म्हणाले.
अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने गुरुवारी राजकीय वादळ उठले. चौधरी तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली होती. काँग्रेसने भारतातील प्रत्येक नागरिकाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.
हेही वाचा: ‘मुंबईचं वैभव गिळायचं आहे, हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन’
सोनिया गांधी तुम्ही द्रौपदी मुर्मू यांच्या अपमानास मंजुरी दिली. सोनियाजींनी सर्वोच्च घटनात्मकपदावर असलेल्या महिलेचा अपमान मान्य केला. तुम्ही प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान केला आहे. तुम्ही देशाची माफी मागावी. सोनिया गांधी तुम्ही देशातील आदिवासी, गरीब आणि महिलांची माफी मागा, असेही स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.
Web Title: Smriti Irani President Draupadi Murmu Insult Adhir Ranjan Chowdhury Letter To The Speaker
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..