Amol Mitkari: "राज्यपालांनी जास्त वेळ महाराष्ट्रात थांबू नये, उत्तराखंडमध्ये निघून जावं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

"राज्यपालांनी जास्त वेळ महाराष्ट्रात थांबू नये, उत्तराखंडमध्ये निघून जावं"

मुंबई : राज्यपालांनी मुंबईबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर होत असलेल्या विरोधानंतर महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे. यासंदर्भात पत्रक काढून त्यांनी माफी मागितली असून मला महाराष्ट्रात सामावून घ्या असं अवाहनही केलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करेल असं सांगितलं आहे.

(NCP Amol Mitkari On Governor Bhagatsingh Koshyari)

"काही लोकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी आता माफी मागितली असेल तर आम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करतो, महाराष्ट्रातील बळीराजा मोठ्या मनाचा आहे. क्षमा वीरस्य भूषणम्... त्यांनी आता महाराष्ट्रात जास्त वेळ थांबू नये, त्यांनी उत्तराखंडमध्ये परत गेलं तरी काही हरकत नाही. त्यांचं आता वानप्रस्थाश्रम सुरू झालं आहे." अशी बोचरी टीकाही मिटकरींनी यावेळी केली आहे.

हेही वाचा: शिंदे गटातल्या 'या' नेत्यांची ईडीपासून सुटका? पाहा यादी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. या विधानावर अनेक स्तरातून होत असलेल्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर आज भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.

Web Title: Amol Mitkari On Governor Bhagatsingh Koshyari Mumbai Sentence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top