Bachchu Kadu vs Ravi Rana : बच्चू कडू- राणा वादात मुख्यमंत्री करणार मध्यस्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu Vs Rana

Bachchu Kadu vs Ravi Rana : बच्चू कडू- राणा वादात मुख्यमंत्री करणार मध्यस्थी

मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दोघांमध्ये वाद सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी असे आवाहन केले आहे.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेले सर्व आमदार मनापासून आले असून त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे देण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांची कुठेही देवाण-घेवाण झाली नाही. राज्याच्या विकासासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे येथे पैशांचा कुठेही विषय येत नाही,’’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.