Ravi Rana : रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी; तो म्हणतोय मी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवी राणा

Ravi Rana : रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी; तो म्हणतोय मी...

नागपूरः सतत वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहणारे आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यातमध्ये फिर्याद देण्यात आलीय.

आमदार रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये आठ-दिवसांपासून मोबाईलवर धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकही शब्द उच्चारला तर रवी राणा यांना पिस्तुल आणि चाकूने ठार मारु, अशी धमकी दिल्याचं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सध्या राणा हे नागपूर येथे अविशेशनासाठी उपस्थित आहेत. त्यापूर्वीच आमरावती येथे असतांना त्यांना या धमक्या आलेल्या आहेत.

हेही वाचा: Winter Session 2022 : विधानभवनासमोर तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस धावले अन्यथा...

अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अटक करण्याची मागणी आ. रवी राणा यांच्या वतीने करण्यात आलीय. सदरील व्यक्ती उद्धव ठाकरे यांचा समर्थक असल्याचं सांगत असल्याचं गुहे यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून राणांच्या वतीने पोलिसांत तक्रार देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Ravi Ranawinter session