विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; अपघाताचा भयानक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; अपघाताचा भयानक Video Viral

अमरावती : अमरावती येथील दर्यापूर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २२ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. तर या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, दर्यापूर तालुक्यातील जे. डी. पाटील महाविद्यालयाच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमधून बसवून परतीचा प्रवास केला जात होता. यावेळी एका वळणावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉली पलटी झाली. यामध्ये २२ विद्यार्थी जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना अमरावतीच्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ट्रॅक्टरमध्ये जवळपास २५ विद्यार्थी होते. यापैकी संपूर्ण विद्यार्थी जखमी झाले असून काही जणांना अमरावती सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांना शिक्षकांविना ट्रॅक्टरमधून प्रवास का करावा लागला? ट्रॅक्टर चालक पूर्ण शिकलेला होता का? याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :accidentstudenttractor