

esakal
Amravati Latest News : अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या ११ प्रमुख मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेनंतरही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले. आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समुदाय विकास अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्यसेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रलंबित प्रोत्साहनपर रकमेचा तात्काळ भरणा, भविष्यातील देयकांसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करणे, दुर्गम भागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा व निवास सुविधा, अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मानधन तसेच बदली प्रक्रियेत पारदर्शकता आदी प्रमुख मागण्यांसाठी समुदाय विकास अधिकारी सातत्याने संघर्ष करीत आहेत. नेटवर्क अडचणीच्या भागात ऑफलाइन रिपोर्टिंग व्यवस्था लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण आरोग्यसेवेत समुदाय विकास अधिकारी हा महत्त्वाचा घटक आहे. मातृ-बाल आरोग्य, लसीकरण व संसर्गजन्य रोगनियंत्रणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते, मात्र सेवाशर्ती आणि प्रशासकीय प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नाराजी वाढल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सीएचओंच्या या आंदोलनामुळे मातृ-बाल आरोग्यसेवा, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, आरोग्य जनजागृती आदी कार्यक्रम प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून मागण्यांबाबत जिल्हास्तरावर चर्चा झाली, मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य समुदाय विकास अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज दाणे, कार्याध्यक्ष डॉ. अनुराधा उबाळे, अपेक्षा देशमुख, डॉ. समाधान तायडे, सचिव डॉ. साकीब अहमद, कोषाध्यक्ष अनिक एकडे आदींनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.