Amravati violence: चॅनल्सनी वृत्त दाखवताना, वेळ नमूद करावी - गृहमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

Amravati violence: चॅनल्सनी वृत्त दाखवताना, वेळ नमूद करावी - गृहमंत्री

मुंबई: राज्यात आज अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या (Amravati violence) पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. परिस्थितीवर लक्ष असून स्थिती आता नियंत्रणात आहे असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. "राज्यात शांतता ठेवण्यासाठी विनाकारण सामजिक द्वेष वाढेल, अशी कृती कोणाकडूनही होऊ नये" असे सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजबद्दल गृहमंत्री म्हणाले.

"चॅनल्सनी वार्तांकन करताना जी दृश्य दाखवताय, ती चित्र दाखवताना वेळही नमूद करावी" असे गृहमंत्री म्हणाले. "कोणालाही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. निवेदन देण्यापुरता परवानगी होती" असे वळसे-पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा: अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव

अमरावती, महाराष्ट्रातील लोकांना आवाहन आहे की, "सगळ्यांनी संयम बाळगावा. कायदा हातात घेऊ नये" "त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाची आवश्यकता वाटत नाही" असे वळसे-पाटील यांनी सांगितले. "निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यात जमाव जमला आणि त्यातून अप्रिय घटना घडल्या" असे वळसे पाटील म्हणाले.

loading image
go to top