अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव I Coronavirus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

White Tailed Deer

अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये हा रोग वेगाने पसरत असल्याचे पहायला मिळत आहे.

अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बांगोर : अमेरिकेतील नवीन संशोधनात असं दिसून आलंय, की पांढऱ्या शेपटीच्या हरणांना SARS-CoV-2 ची लागण झालीय. हा तोच विषाणू आहे, ज्यामुळं मानवांमध्ये COVID-19 चा संसर्ग झाला होता. मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, इलिनॉयस आणि न्यूयॉर्क राज्यांत जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान चाचणी करण्यात आलेल्या 40% हरणांमध्ये हा विषाणू आढळून आलाय. तर, आयोवामध्ये नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान घेतलेल्या 80% हरणांच्या नमुन्यांत या विषाणूचा समावेश आहे.

याबाबत संशोधकांनी निष्कर्ष काढलाय, की हरीण सक्रियपणे एकमेकांना विषाणू प्रसारित करत आहे. शास्त्रज्ञांनी SARS-Cov-2 चे विविध प्रकार देखील ओळखले असून ज्यात हरणांना या विषाणूचं संक्रमण झालेलं स्पष्टपणे आढळून आलंय. उत्तर अमेरिकेत मोठ्या संख्येनं पांढऱ्या शेपटीच्या हरणांची संख्या आणि ते सहसा लोकांच्या जवळ राहतात, या वस्तुस्थितीमुळं हा रोग दोन प्रजातींमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात..

अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये हा रोग वेगाने पसरत असल्याचे पहायला मिळत आहे. विशेषतः 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यांत मानवाला कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. मागील अभ्यासातून असं दिसून आलंय, की SARS-CoV-2 हा रोग मांजर, कुत्री, प्राणी आणि विशेषत: पाळीव प्राण्यांना देखील होत आहे. मात्र, आतापर्यंत हा रोग वन्यप्राण्यांमध्ये पसरल्याचे दिसून आलं नाही. पांढऱ्या शेपटीचं हरण उत्तर अमेरिका, कॅनडा व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आढळणारा सस्तन प्राणी आहे. एकट्या अमेरिकेत त्याची संख्या सुमारे 30 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे.

loading image
go to top