अमृता फडणवीस यांचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

भारतामध्ये सांस्कृतिक विविधतांमध्ये मकरसंक्रांतीचेसुद्धा एक विशेष महत्त्व आहे. देशातील अनेक भागांमध्ये हा सण साजरा केला जातो

पुणे : मकरसंक्रातीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देतान नागरिक दिसत आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

या सणानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने म्हणजेच अमृता फडणवीस यांनी टि्वटर अकाउंटवरती एक फोटाे शेअर करत तिळ गुळ घ्या गोड गोड बोला-मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-और लोहरी दी लाख लाख वधाइयाँ ! अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मकर संक्रात हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे.

या सणाला विविध राज्यामध्ये वेगवेगळी नावे आहेत, परंतू हा सण पुर्ण देशामध्ये उत्साहात साजरा केला जातो. भारतामध्ये सांस्कृतिक विविधतांमध्ये मकरसंक्रांतीचेसुद्धा एक विशेष महत्त्व आहे. देशातील अनेक भागांमध्ये हा सण साजरा केला जातो परंतु प्रत्येक राज्यात या सणाचे नाव आणि प्रथा वेगवेगळ्या आहेत. उदा. देशातील दक्षिणेकडील राज्य केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये या सणाला फक्त संक्रांती म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हटले जाते आणि येथे चार दिवस हा सण साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणामध्ये या सणाला लोहडी म्हटले जाते. आसाममध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकरसंक्रांती म्हटले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मकरसंक्रांतीनंतर थंडी म्हणजेच हिवाळा ऋतू समाप्त होऊ लागतो आणि उन्हाचा प्रभाव वाढू लागतो. सूर्य उत्तरायण झाल्यामुळे असे घडते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. एकूणच वसंत ऋतूचे आगमन होते आणि वातावरण बदलते. मान्यतेनुसार महाभारतामध्ये भीष्म पितामह यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीचा प्राण त्याग केला होता.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrita Fadnavis give to Greetings to makar sankranti on people