esakal | मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आले अन्‌ दंड भरून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्लॅस्टिक कव्हर असलेले पुस्तक व पुष्पगुच्छ घेऊन हॉटेलमध्ये आलेल्या जालना व लातूर येथील पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आयुक्तांच्या आदेशाने वसूल करण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आले अन्‌ दंड भरून गेले

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद- महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यापासून प्लॅस्टीकबंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिका अधिकारी, भाजप नगरसेविकेला दंड लावल्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी (ता. 10) शिवसेना पदाधिकाऱ्यांना धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्लॅस्टिक कव्हर असलेले पुस्तक व पुष्पगुच्छ घेऊन हॉटेलमध्ये आलेल्या जालना व लातूर येथील पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आयुक्तांच्या आदेशाने वसूल करण्यात आला. 

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात प्लॅस्टीकबंदीची कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी स्वागतासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्याला त्यांनी पाच हजार रुपये दंडाची पावती दिली होती. त्यानंतर भाजप नगरसेविकेने पेनची भेट देताना प्लॅस्टिक कव्हर वापरले म्हणून 500 रुपयांचा दंड आयुक्तांनी लावला. दरम्यान आयुक्तांच्या कार्यतत्परतेचा फटका जालना व लातूर येथून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस शहरात होते. त्यांच्या स्वागतासाठी विविध जिल्ह्यातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या श्री. ठाकरे थांबलेल्या एका हॉटेलात गर्दी केली होती.

यापैकी अनेकांनी पुष्पगुच्छासाठी प्लॅस्टिकचा वापर केला होता. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय बैठकीसाठी गेले असता, हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सोबत असलेले स्वीय सहायक शंकर मरापे यांना दंडाची पावती देण्याचे आदेश दिले. त्यांनी जालन्याचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव व लातूरचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची पावती देत दंड वसूल केला. 

अनेकांनी फेकले प्लॅस्टिक 
आयुक्तांच्या या कारवाईनंतर अनेकांनी पुष्पगुच्छांना असलेले प्लॅस्टिक काढून ते डस्टबीनमध्ये टाकले. या प्रकारानंतर आयुक्तांनी प्लॅस्टिक असलेले पुष्पगुच्छ घेऊन कोणी आल्यास तुमच्यावर देखील कारवाई केली जाईल, अशी तंबी महापालिका आयुक्तांनी दिली. 

हेही वाचा -

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

  Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

go to top