
मुंबई : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या अटकेवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. रविवारी राणा दाम्पत्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दुसरीकडे हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज सोमवारी (ता.२५) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. (Amruta Fadnavis Criticize Chief Minister Uddhav Thackeray)
दुसरीकडे फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हिंदीत ट्विट करुन टीका केली आहे. त्या म्हणतात कलियुगच्या या राजाने आता एक नवीन आदेश काढले आहे, जो उगळेल 'च' ची शिवी, त्याला इज्जत आणि मान आहे. जो जप करेल प्रभूचा, उसकी हलक में जान है ! अशी कोटी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
एकंदरीत भाजपकडून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे शिष्टामंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आज दिल्लीत गेले आहे.