राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही - देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

तुम्ही रोज घोटाळे करणार असाल तर कोण येईल तुमच्याकडे, महाविकास आघाडीला फडणवीसांचा टोला

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही - देवेंद्र फडणवीस

भाजप संघर्ष करणारी पार्टी आहे. त्यामुळं आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 'सकाळ' दिलेल्या एक्सक्लुजीव मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर जश्यास तस उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे. आम्ही देशाच्या ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली आहे. तुम्ही जर रोज घोटाळे करणार असाल तर कोण येईल तुमच्याकडे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

हेही वाचा: अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची

किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटून परत जात असताना खार पोलिस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले. यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, काल पोलिस स्टेशनमध्ये माणूस सांगून जातो आहे. बाहेर ७० जण लोकं उभी आहेत तिथे त्यांच्यावर हल्ला होतो, ही लाजिरवाणी स्थिती आहे. राज्यातील हे सगळ्यात वाईट पर्व आहे. राणा दाम्पत्य यांची हनुमान चालीसा म्हणायची इच्छा होती. कशाला येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला केला. जे प्रकरण काहीचं नाही तेच मोठं केलं असल्याचेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: 'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं'

पुढे ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी सहनभुती मिळावी म्हणून हे सगळं केलं. एका महिला खासदाराल रात्री तुरुंगात टाकलं आहे याची पोलिस कर्मचाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. भाजप संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही. त्यामुले याप्रकरणावर जश्यास तस उत्तर दिलं जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. आम्ही देशाच्या ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Devendra Fadnavis Says Presidential Reign Will Not Demand The Implementation In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top