
ये भोगी !...शिक आमच्या 'योगीं'कडून, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई : महाराष्ट्रात भोंग्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत एक बैठक बोलवली होती. त्याला भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अनुपस्थित राहिले होते. मशिदींवरील भोंगे उतवरण्यासाठी ३ मे ही शेवटची तारीख ठाकरे यांनी राज्य सरकारला दिली आहे. भोंग्यांवरुन अमृता फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ट्विट करुन टीका केली आहे. ये भोगी, काही तरी शिक आमच्या 'योगीं'कडून !, असा अमृता यांनी ठाकरे यांना सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना योगींकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. (Amruta Fadnavis Criticize Uddhav Thackeray For Loudspeaker Politics)
हेही वाचा: वारंवार पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणारे राज ठाकरे रंगबदलू - वडेट्टीवार
दरम्यान राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. राज ठाकरे म्हणतात, उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!, असा टोला राज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, असे राज म्हणाले.
हेही वाचा: अजित पवार म्हणाले, 'कुणी कुठं काय म्हणावं हा ज्याचा त्याचा अधिकार, पण..'
महाविकास आघाडीचीही सभा येत्या काळात होणार आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहावे लागेल. मनसेचे पदाधिकारीही दररोज शिवसेनेला डिवचणारे वक्तव्य करताना दिसत आहेत.
Web Title: Amruta Fadnavis Criticize Uddhav Thackeray For Loudspeaker Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..