
''मला सुद्धा धक्का होता, की...'', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाउत्सव कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना (Amruta Fadnavis) टोला लगावला होता. आज अमृता फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
हेही वाचा: हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाउत्सव कार्यक्रमात अमृता फडणवीसांच्या गाण्यांवरून त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यावरून अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. ''मला सुद्धा धक्का होता. मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे. छान आहे. अशीच गुणी मंडळी कुटुंबात जोपासा'', असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? -
राज्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रंगल्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाउत्सव कार्यक्रमाचा आनंद घेत होते. यावेळी राज्यातील विविध अधिकाऱ्यांनी त्यांची कला सादर केली. त्याच हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला होता. "आजपर्यंत एकच व्यक्तीला गाता येतं, असं मला वाटत होतं. पण, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात, असं मला आदित्यने सांगितलं होतं. मी सर्च केलं तर खरंच ते छान गातात", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Web Title: Amruta Fadnavis Replied Cm Uddhav Thackeray Over Song Criticism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..