
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.
हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेला घेऊन विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नसल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदारांसोबत वर्षा या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना खासदार राऊत म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीत काय करायला हवं यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. खासदारांच्या मतदारसंघातील प्रश्न त्यांनी समजून घेतले. याशिवाय शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा २६ ते २९ मे या काळात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात होणार आहे. दरम्या या बैठकीतील तीन मुद्द्यांची माहिती देताना राऊत म्हणाले, १४ मे रोजीची सभा, शिवसंपर्क अभियान आणि मराठवाड्यातली ८ जूनची सभा होणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही चर्चा झाली आहे. प्रभू श्रीराम आम्हाला नेहमीच साद घालत असतात. आमचे आणि प्रभू श्रीरामाचे राजकीय नाते नाही. बाबरीच्या बंदिवासातून मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येला जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: भोंगे बंद करण्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, 'फक्त मशिदींवरील...'
मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिल्या सुचना
विरोधकांनी हिंदुत्वाची चिंता करण्याची गरज नाही. त्याचं हिंदुत्व हे तकलादु आहे. हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही असंही ते म्हणाले आहेत. संघटना बांधणीत मागे राहु नका. नकली हिंदुत्ववाद यांचा आव्हान नाही, त्यामुळं आम्ही लढू, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या कार्यकर्त्याला रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाह कडे लक्ष द्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. शिवसेनेचा भगवा घराघरात पोहोचवा. शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा आहे आणि या पुढे उभा राहणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे जाणार आयोध्या दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा याआधी केली आहे. आता यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. लवकरच त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महिन्याच्या १४ तारखेला मुंबईत बीकेसीमध्ये आणि ८ जूनला मराठवाड्यात सभा घेणार आहेत. त्याशिवाय ते अयोध्येचा दौराही करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..
Web Title: Uddhav Thackeray Criticized To Opposition Party On Hindutva Do Not Statement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..