Devendra Fadnavis: 'ती' एक गोष्ट, देवेंद्रजींचा राग शांत झालाच म्हणून समजा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis: 'ती' एक गोष्ट, देवेंद्रजींचा राग शांत झालाच म्हणून समजा!

Devendra Fadnavis: 'ती' एक गोष्ट, देवेंद्रजींचा राग शांत झालाच म्हणून समजा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. दरम्यान, त्यांची पत्नी अमृता फडणवीस मराठी बिग बॉसच्या घरात दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पोहचली होती. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. (Amruta Fadnavis Talk About Devendra Fadnavis Favorite Diwali Faral )

बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांना राज्यातील राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले.

बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फराळात काय आवडतं असं सवाल उपस्थित केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना फराळात पोहेतरी खूप आवडते. यासोबतच, त्यांना करंजी खायलाही खूप आवडते. असे उत्तर अमृता यांनी दिलं.

अमृता यांच्याबरोबरच एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या आवडी निवडीवर भाष्य केले होते. मी खादाडच आहे आणि मला सर्वच पदार्थ आवडतात. भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो. त्यामुळे मी रागावल्यावर मला खायला मिळाले की माझा लगेच राग निवळतो. असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे.

तसेच, अमृता यांनी बिग बॉसच्या घरात राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. बिग बॉसच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, त्याचा कॅप्टन कोण?’ असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीसांनी फारच मिश्किलपणे उत्तर दिले. “मी तुम्हाला दोन नाव सांगते, सध्या ते महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत.

यातील एक व्यक्ती प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. या कॅप्टनपैकी पहिले नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले कॅप्टन आहेत. दुसरे कॅप्टन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.