अमृता फडणवीसांकडून ट्विटरवर लाईक मिळवण्यासाठी हे करा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

अमृता फडणवीसांकडून ट्विटरवर लाईक मिळवण्यासाठी हे करा...

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या विधानाबाबत कायम चर्चेत असतात. दरम्यान काल देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक मजेशीर ट्वीट करत लोकांना प्रश्न विचारले आहेत. बरोबर उत्तर देणाऱ्याला अमृता फडणवीसांकडून लाईक मिळणार आहे असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

(Amruta Fadnavis Twit)

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत एक प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीट करत आज मी...... असा प्रश्न विचारला आहे. आणि या रिकाम्या जागेत भरण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. त्यामध्ये आज अमृता फडणवीस काय करणार हे लोकांनी निवडून उत्तर देण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

  • आज मी कोरोना संक्रमित झाले आहे.

  • एक दु:खी प्रेमगीत लिहित आहे.

  • पावसाच्या आधी मुंबईतील रस्त्यावर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे.

असे तीन पर्याय त्यांनी या ट्वीटमध्ये दिले आहेत. आणि आज मी काय करणार याचं उत्तर या पर्यायातून द्या असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान त्या शिवसेनेवर आणि मुंबईतील रस्त्यावर अनेकवेळा टीका करत असतात. याअगोदर त्यांनी मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यामुळे महिलांचे घटस्फोट होतात असं म्हटलं होतं. त्यानंतर या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. पण आजच्या या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्याला अमृता फडणवीस यांच्याकडून ट्वीटरवर एक लाईक मिळणार आहे.

Web Title: Amruta Fadnavis Twit Give Correct Answer For One Like

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top