
राज्यातील परिस्थितीवर अमृता फडणवीसांचंं ट्वीट, म्हणाल्या..
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यातील राजकीय वर्तुळात वेगळेच राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थितप्रकारे बंड केलं असून ते सध्या सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास ४० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. (amruta fadnvis tweet amide eknath shinde shivsena conflict over cm uddhav thackeray)
दरम्यान विरोधी पक्ष भाजपकडून मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवत वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आलेली आहे, यादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या परिस्थितीवर सूचक असं ट्वीट केलं आहे. त्यांनी आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी एक 'था' कपटी राजा... ... असं लिहीलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थीती पाहाता हा थेट टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मात्र थोड्याच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीट सुध्दा केलं.

हेही वाचा: राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी कोणाला? मोदींच्या उपस्थितीक भाजपची बैठक सुरू
दरम्यान शिंदे यांच्या कथित बंडाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं असून सध्या एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. यातच नार्वेकरांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दोन प्रस्ताव मांडले होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला शिंदेंनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना आता संकटात सापडली आहे. त्यानंतर आता शिवसेना काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर सर्व पक्षांच्या बैठकांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर 'सिल्वर ओक'वर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये अजित पवार, शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हजर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपल्या सोबतच राहणार आहेत. तर एकनाथ शिंदे लवकरच आपल्यात असतील असं ते म्हटले आहे
हेही वाचा: Eknath Shinde: भाजपची खेळी उलटणार, नाना पटोलेंना विश्वास
Web Title: Amruta Fadnvis Tweet Amide Eknath Shinde Shivsena Conflict Over Cm Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..