esakal | वंचित आघाडीला मोठा धक्का; आंबेडकर बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

anandraj ambedkar quits vanchit bahujan aghadi

- वंचित बहुजन आघाडीला आणखी एक मोठा धक्का
- आनंदराज आंबेडकर वंचितला देणार सोडचिठ्ठी 

वंचित आघाडीला मोठा धक्का; आंबेडकर बाहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून आनंदराज आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देणार आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन कार्यक्रमात याबाबतची ते घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दादर येथील आंबेडकर भवनात रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून वंचितमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेत येण्यासाठी ते अवाहन करणार आहेत.

बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी देण्याबाबतचा निर्णय घेणे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 

उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या दोन महत्वाच्या नेत्यांवरोधात पोलिसांत तक्रार

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी हा लोकसभा निवडणुकीपासून तिसरा पर्याय समोर येत असतानाच एकामागोमाग वंचित आघाडीला धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठी मते मिळवलेल्या वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा महत्वाचा घटक पक्ष एमआयएम बाहेर पडला. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पाहावे तशे यश मिळाले नाही. त्यांनंतर आनंदराज आंबेडकरांनी सोडचिठ्ठी देणे हा वंचित आघाडीसाठी मोठा झटका आहे.