उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला फसविले; पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या दोन महत्वाच्या नेत्यांवरोधात पोलिसांत तक्रार​

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे (वय-34,रा.बेगमपुरा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

असा ठरला फॉर्म्युला; या प्रमुख नेत्यांकडे असणार मंत्रीपद

राज्यात मोठा सत्तापेच निर्माण झाला असून शिवसेनेची भारतीय जनता पक्षासोबत युती होती. ते एकत्र निवडणुक लढले होते. मात्र निवडणुक निकालानंतर ही युती सत्तेच्या वाटपावरून तुटली आहे. या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळूनही यांनी सत्ता स्थापन केलेले नाही. महायुतीच्या नावाखाली शिवसेनेने मते मिळवली आणि आता सत्तेच्या लालसेपोटी सेना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसोबत जात असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दोन प्रेयसींचा अनैतिक संबधातून प्रियकरांनीच केला खून

2019 विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान, औरंगाबादमध्ये प्रचार करून हिंदुत्वाचे रक्षण करण्याकरिता शिवसेना भाजप महायुतीला मतदान कराण्याचे आवाहन करण्यात आले होते. आम्ही त्यांच्या आवाहनाला फसून व त्यांच्यावर विश्वास ठेऊन महायुतीला मतदान केले होते. परंतु त्यांनी युतीचे सरकार स्थापन न करता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला असल्याने ही तक्रार दाखल करत असल्याचे या तक्रारी म्हटले आहे.

बंद खोलीत मुली करत होत्या चाळे अन् आईने

दरम्यान, राज्यात 105 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्या आभावी सरकार स्थापन करता आले नाही. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम राहिल्याने भाजपला सत्तापासून लांब रहावे लागले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका  यशस्वी झाल्या असून, फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police complaint filed against Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Aurangabad