esakal | ED: अडसूळांना दिलासा नाहीच, उद्याच हायकोर्टात लावावी लागणार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

Anandrao adsul

अडसूळांना दिलासा नाहीच, उद्याच हायकोर्टात लावावी लागणार हजेरी

sakal_logo
By
सुधीर काकडे

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी ईडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. अडसुळ यांच्या वकीलांनी मागणी केली की, याचिकाकर्ता वयस्कर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ईडीचे अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर येत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेले उपचार लक्षात घेता त्यांना अटक करू नये अशी मागणी अडसुळाच्या वकिलांनी केली आहे. आजच्या या सुनावणीत आनंदराव अडसूळ यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी उद्याची तारीख देण्यात आल्याचे समजते आहे.

ईडीच्या वकीलांना सांगितले की, ईडीचे अधिकारी समन्स घेऊन जाताच आरोपी आजारी पडला आणि त्याने स्वतःला रुग्णालयात भरती करून घेतले. तसेच संशयित मग न्यायालयाची पायरी चढतात, याचिका दाखल करतात आणि दिलासा मागण्याचा प्रयत्न केला जातो. मग संशयिताची चौकशी कशी करायची, ईडीचे अधिकारी काम कसं करणार असा प्रश्न ईडीच्या अधिकार्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात

न्यायालयाने दिली उद्याची तारीख...

दरम्यान, उच्च न्यायालयातीय या सुनावणी दरम्यान, ईडीच्या वकीलांनी आरोप केला की, हे प्रकरण गंभीर आहे. आनंदराव अडसूळ हे आपल्या राजकीय ओळखींचा वापर करून भरती दाखल झाले आहे. अडसूळ यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायालयाने उद्याची तारीख देण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे आता आनंदराव अडसूळ यांना कोर्टाने दिलासा दिला नाही असे समजे आहे.

loading image
go to top