

anant garje
esakal
Anant Garje: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक अनंत गर्जे याच्या लग्नाला अवघे १० महिने झालेले असताना त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अनंत याचे विवाहबाह्य संबंध होते, ही बाब गौरीच्या निदर्शास आलेली होती, त्यामुळे झालेल्या वादातून तिने जीव दिला असं प्रथमदर्शनी दिसून येतंय. मात्र गौरीचे वडील अशोक पालवे यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.