Andheri By-Election: भाजपच्या फायद्यासाठी CM शिंदेंची खेळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shidne

Andheri By-Election: भाजपच्या फायद्यासाठी CM शिंदेंची खेळी!

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली असून आपण या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवले आहे. तर शिंदे गटाच्या या निर्णयाचा फायदा भाजपला होणार आहे.

(Eknath Shinde New Plan For Andheri By-Election)

दरम्यान, शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कुणाला मिळणार? यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने ८०० पानांचा ई रिप्लाय आज निवडणूक आयोगाला सादर केला आहे. तर शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: Shivsena: धनुष्यबाण कुणाला मिळणार? ठाकरे गटाचा 800 पानांचा रिप्लाय सादर

तर आज ठाकरे गटाने काल १८० प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगात सादर केली होती. त्यानंतर आज ८०० पानाचे उत्तर आयोगात दाखल केले आहे. तर या प्रकरणी तात्काळ सुनावणीची गरज नाही असंही सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते असं म्हणत कागदपत्रांची तयारी पाहण्यासाठी ठाकरेंनी आयोगाला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता अंधेरी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बिघडणार आहेत.

शिवसेना कुणाची आणि पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असताना हा निर्णय लागला नाही तर अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार? कोणत्या पक्षचिन्हाच्या अंतर्गत त्यांना उमेदवारी मिळणार? निवडणूक आयोगाकडून त्यांना मान्यता मिळणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर आता शिंदे गटाने हा निर्णय घेतल्यामुळे त्याचा भाजपला मोठा फायदा होणार आहे. तर शिवसेनेची या निवडणुकीत कोंडी करण्यात शिंदे-फडणवीस यशस्वी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा: Mumbai Kurla Fire: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग, बचावकार्य सुरू

तर शिंदे गटाकडून पोटनिवडणुकीत उमेदवार देणार येणार नाही तर मग पक्षचिन्हाबाबतची स्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या विषयावर तात्काळ सुनावणीची गरज नाही असंही सांगण्यात आलं आहे.