Devendra Fadnavis: अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कारण

Andheri byelection devendra Fadnavis on withdraw  of bjp candidate against rutuja latake maharashtra Politics
Andheri byelection devendra Fadnavis on withdraw of bjp candidate against rutuja latake maharashtra Politics

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलच तापलं असातना भाजपने आपला उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली होती, त्यानंतर पराभव समोर दिसत असल्याने भाजपने या निवडणूकीतून माघार घेतल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून करण्यात आले होते, दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला या निवडणूकीत विजयाची गॅरंटी होती असे फडणवीस म्हणाले आहेत.

अंधेरीच्या पोटनिवडणूक संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला. कार्यकर्ते आणि मुंबई युनिटचे मत होते की निवडणूक लढवली पाहीजे. तसेच मुरजी पटेल ज्यांनी अपक्ष म्हणून ४५ हजार मते घेतली असा उमेदवार आम्ही उभा केला होता त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण गॅरंटी होती, असे फडणवीस म्हणाले.

तथापि काही ज्येष्ठ लोकांनी विनंती केली, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी विनंती केली. काही लोकांनी समोरून केली तर काही लोकांनी मागून केली. मागून कोणी केली विचारू नका. राजकारणात सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात पण ज्याने कोणी केली त्यावर विचार करून मुख्यमंत्री शिंदे तसेच वरिष्ठांशी बोललो आणि चर्चेनंतर हा निर्णय घेतला असे फडणवीस म्हणाले.

Andheri byelection devendra Fadnavis on withdraw  of bjp candidate against rutuja latake maharashtra Politics
Eknath Shinde: अंधेरीतून भाजपची माघार, प्रताप सरनाईकांचे CM शिंदेंना उद्देशून ट्विट; म्हणाले...

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की अंधेरी पोटनिवडणूकीतून माघार घेण्याचा हा निर्णय पहिल्यांदा घेतलेला नाही. आर आर पाटील, पतंगराव कदम गेले तेव्हा देखील असा निर्णय घेतला होता. काही लोक छोट्या मनाचे असतात. भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले हे खरं आहे, कारण ते पूर्ण लढण्याच्या मूडमध्ये होते. पण नेते म्हणून प्रथा परंपरा पाळत संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात, असे फडणवीस म्हणाले.

Andheri byelection devendra Fadnavis on withdraw  of bjp candidate against rutuja latake maharashtra Politics
Grampanchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल 'भाजप'चाच! देवेंद्र फडणवीसांचा दावा

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत ही निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन भाजपला केले होते. यानंतर भाजपकडून मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भाजपवर पराभवाला घाबरून हा अर्ज मागे घेतल्याचे बोलले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com