Grampanchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल 'भाजप'चाच! देवेंद्र फडणवीसांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis claims  BJP remains number eknath shinde group

Grampanchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल 'भाजप'चाच! देवेंद्र फडणवीसांचा दावा

Grampanchayat Election Result 2022: राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत, दरम्यान ८८९ ग्रामपंचायतींपैकी जवळजवळ ३९७ ठिकाणी भाजपचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ८१ ठिकाणी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ८७ ठिकाणी विजय मिळाला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आम्हीच नंबर वन..

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणूकीत कॉंग्रेस १०४ , राष्ट्रवादी ९८ आणि अपक्ष ९५ ठिकाणी आहेत याचा अर्थ असा आहे की भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, तसेच एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप महाविकास आघाडीच्या एकत्रित आकड्यापेक्षा खूपच पुढे असल्याचे फडणवीस म्हणाले. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवला असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी या विजयासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकर्त्यांचे आभिनंदन देखील केलं.

हेही वाचा: Eknath Shinde: अंधेरीतून भाजपची माघार, प्रताप सरनाईकांचे CM शिंदेंना उद्देशून ट्विट; म्हणाले...

आज राज्यातील ११६५ पैकी १०७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर तब्बल ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका या बिनविरोध झाल्या होत्या. दरम्यान भाजपकडून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा: Amazon Sale: 10 हजार रुपयांत खरेदी करा स्मार्ट एलईडी टीव्ही, येथे पाहा बेस्ट ऑफर्स