Shivsena: ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? काय असणार शिवसेनेचा ‘प्लान बी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? काय असणार शिवसेनेचा ‘प्लान बी’

Shivsena: ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? काय असणार शिवसेनेचा ‘प्लान बी’

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. ऋतुजा लटके यांना ठाकरे यांनी उमेदवारी द्यायचं पक्क झालं. त्यानंतर त्यांच्या नोकरीच्या राजीनाम्याचा मुद्दा समोर आल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देण्याची वेळ ठाकरे गटावर ओढावली आहे. कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागला तर ठीक नाहीतर पुढे काय करायचं? यासाठीचा प्लान बी देखील उद्धव ठाकरे गटाकडून तयार करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते आणि अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेची निवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर या निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात असल्यामुळे पुढची रणनीती आणि शिवसेनेचा प्लान बी देखील तयार आहे.

हेही वाचा: Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत

मिळालेल्या माहिनीनुसार, उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेने अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळे या विरोधात ऋतुजा लटकेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

मात्र, ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकार न झाल्यास ठाकरे गटाकडून प्लॅन बी तयार करण्यात आला आहे. कमलेश राय, प्रमोद सावंत, तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या मातोश्री यांचं नाव अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. काही वेळातच राजीनाम्यावर सुनावणी पार पडेल. .

टॅग्स :Shiv Sena