राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीतील कोणतातरी एक संजय बाहेर जाणार, बोंडेंचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajyasabha Election 2022 Live updates

राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू, आम्हाला आत्मविश्वास आहे

'राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीतील कोणतातरी एक संजय बाहेर जाणार'

मागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु आहे. आज या निवडणुका पार पडत असून काही तासात निकाल समोर येणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून दावे प्रतिदावे सुरु असून आता कोण कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनेक राजकीय घडामोडींनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. (Rajyasabha Election 2022 Live updates)

राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार, असं वक्तव्य भाजपाचे अनिल बोंडें यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: शिवसेनेला 'किंगमेकर' होण्याची संधी, सेना रुजणार की नुसतीच वाजणार?

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची आणि अतितटीची निवडणूक म्हणून पाहिली जातं आहे. आम्हीच जिंकू असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. मात्र भाजप उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde)यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एक संजय बाहेर जाणार असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, कोणता अश्वत्थामा गेला होता, हेही धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल, असेही बोंडे म्हणाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. यामुळे काही काळ विधानभवनात गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे.

हेही वाचा: राऊत विधानभवनात पोहोचण्याआधीच कोर्टाचं समन्स, सोमय्यांमुळे पाय खोलात?

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली, सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींना दिसेल अशी मतपत्रिका दाखवल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे. मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Web Title: Anil Bonde Says One Sanjay From Mahavikas Aghadi Govt Loses Rajya Sabha Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top